BLACK DAYS ¡Disfruta de 6 meses de Plus al 25% de dto! ¡LO QUIERO!
पुस्तक ग
Podcast

पुस्तक ग

27
0

मराठी साहित्य, नाटके , सिनेमे इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणी
Pustak Gappa
PustakGappa

मराठी साहित्य, नाटके , सिनेमे इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणी
Pustak Gappa
PustakGappa

27
0

वॉल्डन प्रकाशनचे स&#2306

पुस्तकं वाचायचं वेड. मग जमवायचं. मग विकायचंही वेड! त्यापायी या माणसानं चांगली नोकरी सोडून दिली. आणि मग तर प्रकाशन काढून पुस्तकांच्या निर्मितीत उतरला. कुठून सुचतात असली भाग्यवान खुळं? कशी परवडतात? काय देतात? 'वॉल्डन प्रकाशना'च्या अभिषेक धनगर यांच्याशी याबद्दल गप्पा #पुस्तकगप्पा च्या पंचविसाव्या सत्रात. सहभाग: अभिषेक धनगर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य
Art and literature 6 months
0
0
0
01:43:13

सानियाशी गप्पा आणि &#821

पुस्तकगप्पा सत्र चोविसावे या वर्षातल्या पहिल्या #पुस्तकगप्पा सानियाशी. निमित्त आहे ’भास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ’स्थलांतर’ या तिच्या कादंबरीच्या इ-प्रतीचं. मांजरपावलांनी येणार्‍या आणि त्यांच्या वेगळेपणानं थक्क करून जाणार्‍या; अनाग्रही, मितभाषी आणि लखलखीत विधान करणार्‍या तिच्या कथा. तशाच तिच्या कादंबर्‍याही. त्यातही ’स्थलांतर’ विशेष आवडीची. ती प्रथम प्रकाशित झाल्याला तीस वर्षं उलटून गेली. सानियाचं मनोगत, मेघनाचं आजचं आकलन सांगणारं एक टिपण, आणि तेजस मोडकची काही सुरेख रेखाचित्रं असं घालून तिची इ-प्रत प्रकाशित करतो आहोत. https://www.amazon.com/dp/B0FQ6PS4QK
Art and literature 9 months
0
0
0
01:20:50

पुस्तकगप्पा : ऋषिके&#235

ऋषिकेश दाभोळकर हा आमचा मित्र ‘कुल्फी’ या मुलांसाठीच्या नियतकालिकाचा आणि ‘अटक मटक’ या वेबसाइटचा संपादक. अलीकडेच त्यानं ‘गोष्टदिंडी’ नावाचा अनोखा उपक्रम पार पाडला. पाठीवर पुस्तकं लादून तो चालत सुटला, वाटेत लागणार्‍या शाळांमधून मुलांना गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पुस्तकं दाखवली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या उपक्रमामधले त्याचे अनुभव अद्भुत आणि उद्बोधक दोन्ही होते. त्यांबद्दल त्याच्याशी गप्पा.
Art and literature 1 year
0
0
0
02:02:22

पपायरस प्रकाशनच्या

आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा पुष्कळ विचार आणि ठाम मतं आहेत.  मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल केलेल्या गप्पा.  सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट  युट्युब ब्लॉग  फेसबुक
Art and literature 1 year
0
0
0
01:59:03

पपायरस प्रकाशनच्या

भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि एकंदरच पुस्तक व्यवहार याबद्दल केलेल्या गप्पा.  सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य पुस्तकगप्पा लिंक्स: पॉडकास्ट  युट्युब ब्लॉग  फेसबुक
Art and literature 1 year
0
0
0
01:26:31

पेगी मोहन यांच्या 'व&#2

पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची ग्वाही देणारंही आहे. त्याचं भाषांतर मनोविकास प्रकाशानातर्फे प्रकाशित होतंय. त्याबद्दल भाषावैज्ञानिक चिन्मय धारूरकर यांच्याशी जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय धारूरकर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
Art and literature 1 year
0
0
0
02:19:38

पुस्तकगप्पा : आपल्य&#236

आपल्यापर्यंत पोचणार्‍या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये  आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले. सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
Art and literature 2 years
0
0
0
03:50:21

पुस्तकगप्पा : ऋषिके&#235

हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही. त्यांच्याशी त्यांच्या कथाकादंबर्‍यांबद्दल आणि त्यांच्या लिहिण्यावाचण्याच्या आवडीनिवडींबद्दल गप्पा. सहभाग : ऋषिकेश गुप्ते, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
Art and literature 2 years
0
0
0
01:41:57

पुस्तकगप्पा : चिन्म&#235

चिन्मय दामले यांच्याशी मराठी पाकपुस्तकांबद्दल गप्पा. मराठी पाकपुस्तकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक इतिहास अतिशय मजेशीर आणि उद्बोधक आहे. त्याबद्दल आणि तिथून आजवर झालेल्या पाकपुस्तकांच्या प्रवासाबद्दल चिन्मय दामले यांच्याशी मारलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.
Art and literature 3 years
0
0
0
01:36:24

पुस्तकगप्पा : गौरी द&#23

गौरी देशपांडे यांच्या मराठी साहित्यातल्या विशेष श्रेयाविषयी, लोकप्रियतेविषयी, मर्यादांविषयी, तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी गप्पा. सहभाग : माया पंडित, जितेंद्र वैद्य, मेघना भुस्कुटे, नंदन होडावडेकर, रंजना निकते.
Art and literature 3 years
0
0
0
01:51:51

पुस्तकगप्पा : आदूबा&#235

सत्र पंधरावे : मराठी संगीत नाटकांच्या आर्थिक इतिहासाबद्दल अभ्यास करताना आदूबाळ यांनी अनेक पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांविषयीच्या या गप्पा. पुस्तकांची यादी
Art and literature 3 years
0
0
0
01:05:00

पुस्तकगप्पा : पुस्त&#232

पपायरस प्रकाशनाचा 'पिवळा पिवळा पाचोळा' हा अनिल साबळे लिखित कथासंग्रह 2021 साली प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाची ही ओळख.
Art and literature 3 years
0
0
0
05:38

पुस्तकगप्पा: अमोल उ&#234

पुण्यामुंबईबाहेरच्या लोकांची सांस्कृतिक उपासमार... जुन्यात अडकून पडलेली समीक्षा... ताजं तरतरीत लिहिणारे नवे लेखक... वितरणव्यवस्थांचं गायब असणं... मराठी कंटेटची तहान आणि ती भागवण्याची इच्छाच नसलेले लेखक-दिग्दर्शक-निर्माते... दक्षिण भारतीय चित्रपटांचं ऋण... समाजमाध्यमांनी आणि मराठी संस्थळांनी लिहिते केलेले लोक... फेसबुक आणि ब्लॉग्सनी वाहता केलेला लेखक-वाचक संवाद... एक ना दोन - #पुस्तकगप्पा 'न- नायक' आणि 'मिडनाईट मॅटिनी'च्या लेखकाशी - अर्थात अमोल उदगीरकर यांच्याशी मिडनाईट मॅटिनी : देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. न नायक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com Pustak Gappa : Amol Udgirkar Interview by Meghana Bhuskute #PustakGappa #पुस्तकगप्पा
Art and literature 3 years
0
0
0
01:05:16

पुस्तकगप्पा : समीना &#23

हरिती प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या भटकभवानी' या ललित-वैचारिक लेखसंग्रहाच्या लेखिका समीना दलवाई यांची मुलाखत.
Art and literature 3 years
0
0
0
02:16:43

पुस्तकगप्पा: मायके&#2354

पुस्तकगप्पा: सत्र बारावे सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, प्राची देशपांडे, शिल्पा पाठक, नंदन होडावडेकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
01:54:06

पुस्तकगप्पा : सुशील &#23

पुस्तकगप्पा : सत्र अकरावे : सुशील शुक्ल यांच्याशी गप्पा 'इकतारा' प्रकाशनाबद्दल सहभाग : सुशील शुक्ल, सई केसकर, ऋषिकेश दाभोळकर, मेघना भुस्कुटे, ऋजुला कुलकर्णी, आरोही देशपांडे, विक्रमादित्य रानडे, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
01:51:17

पुस्तकगप्पा : इतिहा&#236

पुस्तकगप्पा : सत्र दहावे : इतिहास आणि फिक्शन : प्राची देशपांडेंसह सहभाग : प्राची देशपांडे, नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
02:11:03

पुस्तकगप्पा : किरण ग&#23

पुस्तकगप्पा : सत्र नववे: किरण गुरव यांच्याशी गप्पा सहभाग : किरण गुरव, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
01:24:21

पुस्तकगप्पा : विश्व&#236

पुस्तकगप्पा : सत्र आठवे : विश्वामित्र सिंड्रोम : गप्पा पंकज भोसले यांच्याशी सहभाग : पंकज भोसले, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
01:57:55

पुस्तकगप्पा : नंदा ख&#23

पुस्तकगप्पा : सत्र सातवे : नंदा खरे यांच्याशी गप्पा : 'कहाणी मानवप्राण्याची' आणि इतर नॉन-फिक्शन सहभाग : नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, (किरण लिमये) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान : https://www.facebook.com/PustakGappa संपर्क : marathi.upakram@gmail.com
Art and literature 4 years
0
0
0
01:50:52
You may also like View more
Cuentos y Relatos Espacio no profesional dedicado a la lectura de Cuentos y Relatos clásicos realizada con voz humana (sin IA) y amenizada con una ambientación musical o sonora. Literatura de todos los géneros: Misterio, Ciencia Ficción, Terror, Fantástico, Policíaco, Costumbrista... No son audios dramatizados, no son locuciones, no son narraciones. Son simplemente lecturas amateur y un proyecto absolutamente desinteresado sin ánimo de lucro. Algunos de los audios de este podcast pueden herir la sensibilidad del oyente debido a su contenido o lenguaje explícito. Si te consideras una persona sensible en este aspecto, por favor, no lo escuches y elige otro podcast más acorde a tus gustos, de lo contrario, adelante, estás en tu casa. Espero que lo disfrutéis tanto como yo lo hago durante la producción de estos audios. Gracias por anticipado y también por vuestra presencia. ¡Un saludo! Por favor, si te gusta algún audio, no olvides darle al "Me gusta" y compartir en tus redes sociales. ¡Muchas Gracias! Advertencia: Por motivos obvios, cualquier comentario ofensivo, falto de respeto o improcedente, será automáticamente eliminado del podcast. Todos los comentarios serán revisados antes de su publicación. Blog: https://lanebulosaeclectica.blogspot.com.es/ X: @nebulectica Updated
HISTORIAS PARA SER LEÍDAS Ficciones sonoras para sumergirte en otra realidad. Dirigido por Olga Paraíso, autora de Crónicas Vampíricas de Vera. ✉️ Suscríbete a Correo de Medianoche y cada mes recibirás una carta directamente en tu buzón, por correo postal. Más información ✉️https://historiasparaserleidas.wordpress.com/correo-de-medianoche/ Updated
CUENTOS DE LA CASA DE LA BRUJA Los Cuentos de la Casa de la Bruja es un podcast semanal de Ficción Sonora y Audiolibros de Misterio, Ciencia Ficción y Terror. Todos los viernes, en Ivoox, un nuevo audio narrado por locutores humanos. ¿Te atreves? Divago a diario en mi Twitter: @VengadorT. Además te ofrezco mis servicios como locutor online con estudio propio. Puedes contactar conmigo en www.locucioneshablandoclaro.com o en info@locucioneshablandoclaro.com Updated
Go to Art and literature